Railway Ticket Booking Rules : रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांच्या सुविधेची पूर्ण काळजी घेते. गेल्या काही वर्षांत, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. परंतु, काही काळापासून कोरोनाचे घटणारे प्रमाण पाहता काही बंद असलेल्या सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.


रेल्वे मंत्रालयाचा नवा आदेश जारी
2020 सालापासून कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग दरम्यान तुमचे गंतव्य स्थान (Destination) IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर भरणे अनिवार्य केले होते. पण, आता रेल्वे मंत्रालयाने एक नवीन अधिसूचना जारी करून आदेश दिला आहे की, आता प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंग दरम्यान गंतव्य स्थानाचा ( Destination ) पत्ता भरावा लागणार नाही. यामुळे तिकीट बुक करणे सोपे होणार आहे.


तिकीट बुकिंगला कमी वेळ लागेल
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेने प्रवासादरम्यान कोरोना बाधित (corona positive) लोकांचा शोध घेण्यासाठी पत्ता प्रविष्ट करणे अनिवार्य केले होते. परंतु, देशातील संसर्गाची घटती प्रकरणे पाहता, रेल्वे आता पत्त्याची आवश्यकता काढून टाकत आहे.


गंतव्य पत्त्याची आवश्यकता नाही


यापूर्वी मार्च महिन्यात रेल्वेने गाड्यांमध्ये दिलेली बेडरोल, उशा आणि ब्लँकेटची सुविधा पूर्ववत केली होती. यासोबतच आता प्रवाशांना जनरल तिकीट काढूनही सहज प्रवास करता येणार आहे. याबाबत माहिती अशी की, रेल्वे मंत्रालयाने सर्व रेल्वे झोनसाठी गंतव्य पत्त्याची आवश्यकता संपविण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच आता IRCTC आपल्या सॉफ्टवेअरमध्येही बदल करणार आहे, असे सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :