मुंबई: शहरातील कोरोनाची आकडेवारी आता पन्नाशीच्या आत आली आहे. आज मुंबईत 44 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 341 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईमध्ये आतापर्यंत 10,38,764 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 14,960 इतका झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.005 टक्के इतका आहे.
राज्यातील स्थिती
शुक्रवारी राज्यात 69 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 132 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 98, 25, 249 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या: