MSBTE Exams:  भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात सोमवारी सार्जनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. ज्यामुळं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची उद्या (7 फेब्रुवारी) होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर माहिती दिलीय. 


महाराष्ट्र राज्य तंत्र मडाळाची परीक्षा उद्या (7 फेब्रुवारी) घेण्यात येणार होती. परंतु, लता मंगेशकर यांच्या निधनामुळं महाराष्ट्र शासनानं उद्या राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 10 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच वेळेत घेण्यात येणार आहे, याची सर्व विद्यार्थी व संस्थांनी नोंद घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्र मंडळानं दिलीय.


म्हाडाच्या परीक्षा वेळेतच होणार
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9:00 वाजेपासून ते 11:00 वाजेपर्यंत, दुपारी 12:30 वाजेपासून ते 2:30 वाजेपर्यंत तर, दुपारी 4 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे. 


राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?
भारतातील राष्ट्रीय दुखवटा हा संपूर्ण राष्ट्राचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे. तसेच निधन झालेल्या व्यक्तीवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाहीत. राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर मेळावे आणि अधिकृत मनोरंजनावर देखील बंदी असते. यापूर्वी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदावर असताना किंवा पूर्वी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती राहिलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देशात राष्ट्रीय दुखवटा घोषित केला जायचा. मात्र, कालांतरानं राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याच्या नियमात बदल करण्यात आले. त्यानुसार, काही खास मान्यवरांच्या बाबतीतही केंद्राला विशेष सूचना जारी करून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आलाय. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI