Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी 3 बार्ज आणि 1 ऑइल रिग समुद्रात अडकले होते, ज्यामध्ये 700 पेक्षा अधिक लोकं अडकले होते. ज्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश ही आलं. यामध्ये मुख्यतः नौदलाचे जवान आणि त्यांच्या युद्धनौका, हेलिकॉप्टर्स या सर्वांचा महत्त्वाचा वाटा होता.


ज्या वादळात समोर कोणाही टिकू शकल नाही त्या वादळाला तोंड दिलं आणि त्या वादळाशी दोन हात केले भारतीय नौदलाच्या जवानांनी. तब्बल 707 लोकं तीन बार्ज मध्ये आणि एका ऑईल रिग मध्ये अडकल्याची माहिती होती. ज्यांना वाचवण्यासाठी नौदलानं हे वादळही पेलवून नेलं. 


तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका; 3 हजार 375 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्रशासनाकडून प्राथमिक माहिती


1) बार्ज P305 या मध्ये 273 लोकं होती.
यांना वाचवण्यासाठी आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्ध नौका आणि इतर सपोर्ट वेसल यांची मदत घेण्यात आली. आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकत्ता भारतातील सर्वात शक्तिशाली युद्धनौका मानल्या जातात. यामध्ये वापरण्यात आलेली उपकरणं बहुतांश भारतातच बनवण्यात आली आहेत. INS कोलकाताची लांबी 164 मीटर आहे तर रुंदी 18 मीटर इतकी आहे.


2) बार्ज 'gal constructor' वर एकूण 137 लोकं होती.
या बार्जवर अडकलेल्यांना वाचवण्यासाठी इमर्जन्सी टोइंग वेसेल 'वॉटर लिली' आणि दोन सपोर्ट वेसेल सोबत सम्राट सुद्धा पोहोचले. वॉटर लिली ही एक इमर्जन्सी टोविंग वेसल आहे. एखादी शीप, जहाज समुद्रात काही कारणाने बंद पडली तर त्याला खेचुन किनाऱ्यावर आणण्याची जबाबदारी वॉटर लिलीवर असते.


3) ऑईल रिग सागर भूषण वर 101 लोकं अडकली होती.
ऑईल रिंगवर अडकलेल्यांना वाचवण्यासाठी आयएनएस तलवार पोहोचली. आयएनएस तलवार हे भारतीय नौदलाचा तलवार श्रेणीच्या युद्धनौका अर्थात युद्धनौका आहे. हेलिकॉप्टर नेण्याची क्षमता या युद्धनौकेमध्ये असून काही महत्त्वांच्या ऑपरेशन्स मध्ये याचा उपयोग नौदलाकडून करण्यात आला आहे. 


4) बार्ज SS-3 वर 196 लोकं अडकल्याची माहिती.
बार्ज SS-3 वर अडकलेल्यांना मदत देण्याच्या SAR ऑपरेशनसाठी P81 ऐयरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. P81 एअरक्राफ्ट विमान भारतीय नौदलाचा शोध आणि बचाव कार्य करणार एअरक्राफ्ट आहे. समुद्रात शोध कार्य करणे अवघड असतं मात्र या एयरक्राफ्ट मुळे ते सोप्प होतं असं सांगण्यात येतं. 






जी लोकं या वादळामुळे अडकली होती ते दुसऱ्या दिवसाचा उगवता सूर्य पाहतील का हाही प्रश्‍न त्यांच्या मनात उदभवू लागला होता. मात्र या प्रश्नाला उत्तर म्हणून भारतीय नौदल समोर आलं आणि त्यांनी सुखरूपपणे यांना बाहेर काढलं. 'हे आमचं कर्तव्य असून जे काही आम्ही केलं ते करण्यासाठी आम्ही आहोत. पण, लोकांना चक्रीवादळातून वाचवणं हे सर्वात कठीण आणि  आव्हानात्मक ऑपरेशन आहे', असं डेप्युटी चीफ ऑफ नेवल स्टाफ मुरलीधर सदाशिव पवार यांनी सांगितलं.