मध्य रेल्वेच्या या पहिल्या एसी लोकलचे सारथ्य महिला मोटर वूमन मनीषा मस्के करणार आहे. जी भारतातील एसी लोकल चालवणारी पहिली महिला ठरेल. संपूर्ण बारा डबे वातानुकुलित असलेली ही मध्य रेल्वेची पहिलीच लोकल आहे. या लोकलच्या महिलांच्या डब्यात प्रत्येकी सहा सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. तसेच मोटरमन केबिन मध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे.
AC Local | 31 जानेवारीपासून ट्रान्स-हार्बर मार्गावर एसी लोकल, दिवसात 16 फेऱ्या, महिला चालकांवर जबाबदारी | स्पेशल रिपोर्ट
याबरोबरच ऑटोमॅटिक दरवाजे, टॉक बॅक सिस्टीम अशा अनेक सुविधा या लोकलमध्ये आहेत. पनवेल ते ठाणे आणि पनवेल ते वाशी या दरम्यान या एसी लोकलच्या सोळा फेऱ्या दिवसभरात होणार आहेत. मात्र त्यासाठी सामान्य लोकांच्या पंधरा फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या आहेत. गुरूवारी (30 जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास या एसी लोकल चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेला खो देत देशातील पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेला मिळाली आहे. त्यानंतर ब्रिटिशकालीन पुलांच्या उंचीमुळे सीएसएमटी-कल्याण या मुख्य मार्गावर एसी लोकलचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे सर्वाधिक गर्दीची स्थानकं ज्या मार्गावर आहेत, त्या सीएसएमटी-कल्याण मार्गावरील प्रवासी अजूनही एसी लोकलच्या प्रतीक्षेत आहेत.
संबंधित बातम्या :