Sanjay Raut Arrest : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने (ED) ताब्यात घेऊन नंतर अटक केली. रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास संजय राऊत यांना अटक करण्यात आली. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.  दरम्यान, संजय राऊत यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. संजय राऊतांच्या कोर्टातील सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असेल. पण संजय राऊत यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्याची कारणं ईडीने सांगितली आहेत.


संजय राऊत यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक? 
संजय राऊत यांच्या अटक प्रकरणात ईडीने तीन कारणं दिली आहेत. यामध्ये तपासात असहकार, बेहिशेबी रोकड जप्त आणि संशयास्पद कागदपत्र आढळल्याचा उल्लेख आहे. 


ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत अटकेची कारणे - 
1. असहकार
 2. बेहिशेबी रोकड जप्त
 3. गुन्हेगारी दस्तऐवज पुनर्प्राप्त/ संशयास्पद कागदपत्र 


संजय राऊतांची चौकशी कोणी केली?  
ईडीचे अप्पर संचालक सत्यव्रत कुमार यांनी काल संजय राऊत यांच्या अटकेच्या मेमोवर स्वाक्षरी केली होती. आज ईडी कोठडीनंतर सत्यव्रत इतर 4 अधिकाऱ्यांसह राऊतांची अधिक चौकशी करणार आहेत.


संजय राऊत काय उत्तर देत आहेत?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रश्नांच्या उत्तरात राऊत यांनी मला माहिती नाही. आता आठवत नाही अशी उत्तरे दिली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी त्यांनी दिलेल्या उत्तरांवर समाधानी नव्हते. 


ईडीने ज्या साक्षीदारांचे जबाब घेतले ते आणि मनी ट्रेलचे पुरावे यांच्याशी राऊतांचा जबाब जुळत नसल्याने त्यांना ईडी कार्यालयात आणून अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून याच मुद्यांच्या आधारे ईडी कोठडी मागणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray Prediction : संजय राऊत यांना अटक, राज ठाकरे यांचं भाकित खरं ठरलं?


Sanjay Raut Arrest : बोगस प्रकरणात संजय राऊत यांना अटक, शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : सुनील राऊत



Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडीची कारवाई, जाणून घ्या सकाळी सातपासून रात्री 12 पर्यंत काय घडलं


Sanjay Raut Detained : नोटीस, चौकशी, ताब्यात; जाणून घ्या राऊतांवरील ईडी कारवाईचा दोन वर्षातील घटनाक्रम 


Aniket Nikam on Sanjay Raut : संजय राऊतांपुढे आता कोणते पर्याय? कायदेतज्ञ काय सांगतात?