मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध उठवल्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहेत. 16 ऑगस्ट रोजी मुंबईत एका दिवसात 190 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. यात आता दुपटीने वाढ होईल ही वाढ 400 च्या जवळ पोहोचली आहे. मागील 24 तासात मुंबई 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 272 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत गेल्या 24 तासात केवळ एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कमी होणारा कालावधी चिंतेची बाब आहे. दोन हजारांच्या पलिकडे गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी आज 1511 वर आला आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,621 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 3106 सक्रिय रुग्ण आहेत. खबरदारी म्हणून मुंबईतील 29 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 


Maharashtra Corona Update : राज्यात आज  4,196 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 104 रुग्णांचा मृत्यू


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं अॅक्शन प्लान तयार केला आहे. यानुसार एखाद्या इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास, ती इमारत सील केली जाणार आहे. तसेच सील केलेल्या इमारतीच्या गेटवर पोलीसही तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे इमारत सील झाल्यानंतर या इमारतीतून कोणालाही बाहेर येता येणार नाही, तसेच कोणालाही प्रवेश करता येणार नाही. 


Corona Vaccination Update : देशात लसीकरणाचा 'महाविक्रम'; आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करत दिली माहिती


मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई 


मास्क न लावणाऱ्यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी सर्व 24 प्रशासकीय विभागांना दिले आहेत. या अनुषंगाने आवश्यक तेवढ्या अधिक क्लिन-अप मार्शलची तात्पुरती नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांद्वारे करण्यात येत असलेली 'विना मास्क' विषयक कारवाई देखील अधिक तीव्र करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी मुंबई पोलीस दलास दिल्या आहेत.