मुंबई : आयआयटी-बॉम्बेच्या (Mumbai IIT) प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने गंभीर कोविड लक्षणे आढळणाऱ्या आणि कोरोनाचा अधिक धोका संभावणाऱ्या रुग्णांचे  वर्गीकरण करण्यासाठी इन्फ्रा-रेड तंत्रज्ञानाचा वापर करण्याची एक नवीन पद्धत विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान डॉक्टरांना कोरोनाचा मोठ्या प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांमध्ये किंवा कोविड रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना प्राधान्य देण्यास मदत करू शकते. 

Continues below advertisement

India Coronavirus Update: देशात गेल्या 24 तासात 40 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण, एकट्या केरळमध्ये 20 हजार रुग्ण

आयआयटी-बॉम्बे, कस्तुरबा हॉस्पिटल, क्यूआयएमआर बर्गोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया आणि एजिलेंट टेक्नॉलॉजीजच्या संशोधकांचे हे संशोधन शुक्रवारी अॅनालिटिकल केमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. कस्तुरबा येथील 160 कोविड रुग्णांच्या गटात गंभीर प्रकरणांचे वर्गीकरण करण्यासाठी संशोधकांनी फूरियर-ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड (एफटी-आयआर) स्पेक्ट्रोस्कोपीचा  रक्त चाचणी म्हणून वापर केला. 

Continues below advertisement

इन्फ्रा-रेड स्पेक्ट्रोस्कोपी सामान्यतः कोणत्याही रक्ताच्या नमुन्यातील विविध रासायनिक गटांची पातळी मोजण्यासाठी वापरली जाते. कोविड रूग्णांच्या अभ्यासात 85% अचूकतेसह केलेली चाचणी ही उपचारादरम्यान उपयुक्त ठरू शकते. याचाचणी नंतर रूग्णांचे प्राथमिक मूल्यांकन, सामान्यतः कोव्हीड रुग्णाची काळजी घेण्याची निकड ठरवण्यासाठी जिथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात या चाचणीचा वापर केला जाऊ शकतो

RT-PCR चाचणी रुग्णाची प्रकृती कधी बिघडेल किंवा त्यांच्यात कोणती लक्षण आढळतील हे दर्शवत नाही.  हा अभ्यास या समस्येवर एक सोपा आणि किफायतशीर आहे. सध्या, डी-डिमर, सी-रिअक्टिव्ह प्रोटीन, डब्ल्यूबीसी काउंट्स सारख्या चाचण्या रोगाची तीव्रता तपासण्यासाठी वापरल्या जातात, परंतु ही चाचणी आता त्यात महत्वाची ठरेल व कोरोना रुग्णाचे त्यांच्या उद्भवणाऱ्या गंभीर लक्षणावरून त्यांचे वर्गीकरण करणे सहज शक्य होईल