मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शहरात करण्यात आलेल्या पाचव्या सेरो सर्वेत 86 टक्के लोकांमध्ये कोरोना विरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यातील काही लोकांनी व्हॅक्सिन घेतलं होतं. लस घेतलेल्या 90 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या तर काहींनी व्हॅक्सिन घेतलेलं नव्हतं अशा 80 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. या सर्वेत 24 वॉर्डमध्ये 8 हजार 600 रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहे.


सर्वेत समोर आलेल्या माहितीनुसार अँटीबॉडीज मिळण्याचं प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये समसमान आहे. वयोगटानुसार 18 वर इक्वल डिस्ट्रिब्युशन आहे. झोपडपट्ट्या आणि इमारतीत जास्त फरक नाही. दरम्यान असं जरी असलं तरी नियमांचे पालन केले पाहिजे, असे आरोग्य विभागाने म्हटलं आहे.


पहिला, दुसरा आणि तिसऱ्या सेरो सर्वे आणि बालकांच्या सेरो सर्वेत. झोपडपट्ट्यात पहिले कमी असणार वेग वाढत गेला. इमारतीत देखील आधी 16 टक्के होता मग 28 टक्केपर्यंत गेला होता. बालकांमध्ये 51 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. पाचवा अहवाल चांगला अहवाल म्हणावे लागेल. सर्वे करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, की कोव्हिड अॅप्रोप्रिएट बिहेविअरचं पालन करणं गरजेचं आहे.


मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ.. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 376 नमुन्यापैंकी एकही डेल्टा प्लसचा नसल्याचं प्रयोगशाळेचं शिक्कामोर्तब


डेल्टा प्लस : 
जिनोम सॅम्पल - दोन सॅम्पल डेटा गेला होता. यात एकही रुग्ण डेल्टा प्लसचे नाहीत. 60-70 टक्के डेल्टाचे रुग्ण आढळत आहेत. अशावेळी सतर्क असणे आवश्यक आहे. पालिकेकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 


गणेशोत्सवानंतर कोरोना उपाययोजना : 
नियम शिथीलता करतांनाही 2 डोस असणाऱ्यांना प्राधान्य दिलं, बाहेर पडताना मास्क आणि नियमांचे पालन करणं आवश्यक. दंडातून महसूल गोळा करणे हेतू नाही. मात्र, कोरोनाचे आकडे कमी करण्यावर भर असल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलंय.


रुग्णवाढीचं प्रमाण मर्यादेत जरी असलं तरी रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न आहे. तिसरी लाट आपण थोपवू शकतो. आली तरी आपण तयार आहोत. 


गणेशोत्सवानंतर शिथीलता देणार का?
पुढील 15 दिवस महत्त्वाचे आहे. मुंबईतून बाहेर गेलेल्यांची परत येण्यास सुरुवात झाली आहे. अशात बाहेरुन आलेल्यांवर महापालिकेचं लक्ष असेल, टेस्टींग करण्याचं आवाहन करण्यात आल्याचं पालिकेने माहिती दिलीय.