Mumbai Heat Wave : पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, मुंबईसह इतर उपनगरांतही तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच मुंबईकरांना मे महिन्याहून अधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
मार्च (March) महिन्याच्या मध्यातच अंगाची काहिली होण्याची चिन्हं आहेत. कारण पुढील दोन दिवसांत मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईसह, पालघर (Palghar), रायगड (Raigad), ठाण्यातही तापमान 42 अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. सध्या सौराष्ट्र, कच्छ परिसरात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शिवाय उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण-कोरड्या वाऱ्यांमुळे पुढील 48 तासांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात ही अवस्था असेल, तर एप्रिल आणि मे महिन्याची कल्पनाच न केलेली बरी.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबईतील उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचं IMD नं सांगितलं आहे." पुढे ते म्हणाले की, "कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर आणि कमाल तापमान किमान 37°C असावं."
पाहा व्हिडीओ : मुंबईकरांनो, काळजी घ्या! उष्णतेची लाट येणार, पारा 40 अंशांपार जाण्याचा अंदाज
मुंबईकरांना काळजी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन
थंडी उलटून मुंबईत आता सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. मे महिन्याहून अधिक उकाडा मार्च महिन्याच्या मध्यावरच जाणवत आहे. अशातच पुढील दोन दिवसांत मुंबईसह काही शहरांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशातच मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडूनही करण्यात येत आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही नागरिकांना दिला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Aaditya Thackeray : उद्धव ठाकरे देशातील क्लायमेट लिडर ; आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या शिक्षिका सुमन रणदिवेंचं निधन; ठाकरे बंधुंनी वृद्धाश्रमाला केलेल्या मदतीनंतर आल्या होत्या चर्चेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha