वसई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिकविणाऱ्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Randive) यांचं काल रविवारी रात्रीनिधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमन रणदिवे या वसईच्या सत्पाळा गावातील न्यू लाईफ फाऊंडेशन या वृद्धाश्रमात रहात होत्या. सुमन रणदिवे या दादरच्या बालमोहन विद्यालयात (Balmohan Vidyalay) शिक्षिका होत्या. 

मागील वर्षी झालेल्या वादळात सुमन रणदिवे हे राहत असलेल्या वृद्धाश्रमातील  सर्व पत्रे उडाले होते.  त्यानंतर ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी मोठ्या प्रमाणावर या आश्रमाला मदत केली होती. तेव्हापासून सुमन रणदिवे या प्रकाशझोतात आल्या होत्या.

सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासहित अनेक राजकारणी आणि मुंबईकरांना शिक्षणाचे धडे दिले होते. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी विरार येथे करण्यात आला. आश्रमाचे संचालक राजेश फ्रान्सिस मोरो यांनी सुमन रणदिवे यांना आज अग्नि दिला, तशी सुमन रणदिवे यांची इच्छा होती.

तोक्ते चक्रीवादळानं वसईतील न्यू लाईफ फाऊंडेशन या वृध्दाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालेलं. शिक्षिका सुमन रणदिवे यांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंकडे मदतीची याचना केली होती. ती बातमी एबीपी माझाने सर्वात आधी दाखवली होती. त्यानंतर मनसे आणि शिवसेनेसह  सामाजिक संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज मान्यवरांना सुमन रणदिवे यांनी शिक्षणाचे धडे दिले. संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

इतर महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut on BJP : गोवा जिंकलं म्हणून स्वागत झालं, ढोल वाजवले, पण... : संजय राऊत

HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक