मुंबई :  मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिझनच्या पहिल्याच दिवशी उबेर कंपनीकडून विद्यार्थ्याला तब्बल 2 कोटी 5 लाखांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिझनच्या इतिहासातील सर्वाधिक वार्षिक पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. 


दरवर्षीप्रमाणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजपासून मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिझनला सुरूवात झाली. यावर्षीच्या प्लेसमेंट सिझनच्या पहिल्याच दिवशी उबेर कंपनीकडून विद्यार्थ्याला सर्वाधिक 2.04 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. आजवरच्या मुंबई आयआयटीच्या इतिहासातील हे सर्वाधिक वार्षिक पॅकेज म्हणून पाहिले जात आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रुब्रिक कंपनीने आणखी एका विद्यार्थ्याला 90 लाख 58 हजारांच्या वार्षिक पॅकेज ऑफर केले आहे.  तर डोमेस्टिक कंपन्यांमध्ये मिलेनियम कंपनीने 62 लाखाचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे ते दुसऱ्या स्थानावर वर्ल्ड क्वांट कंपनीने 51.71 लाखाचे तर ब्लॅक स्टोन कंपनीने 46.62 लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे


देशातील कंपन्यासोबत परदेशातील कंपन्यांनी सुद्धा प्लेसमेंट सीझनच्या पहिल्या दिवशी मोठे पॅकेज विद्यार्थ्यांना ऑफर केले आहे. कंपन्यांमध्ये गुगल ,मायक्रोसॉफ्ट, बॉस्टन कन्सल्टिग ग्रुप , बेन या सारख्या कंपन्यांनी सर्वाधिक वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत.  पहिल्या दिवशी 28 कंपन्यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी ऑफर केले.


प्लेसमेंट सीझनमध्ये इतरही कंपन्या मुंबई आयआयटी सीझनमध्ये सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 201 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट ऑफर स्वीकारले आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचं आयटीकडून सांगण्यात आले आहे. प्लेसमेंटमध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये आयटी/ सॉफ्टवेअर ,कोर इंजीनियरिंग आणि कन्सल्टिंग कंपन्यांचा समावेश आहे. दरवर्षी भरती करणाऱ्यांनी IIT मुंबईवर विश्वास दाखवला आहे आणि आम्ही त्यांच्याकडून आणखी ऑफरची अपेक्षा करत असल्याचे आयआयटी कडून सांगण्यात आले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha