Aaditya Thackeray : कचऱ्याचे मॅनेजमेंट करायचे असेल तर आपण सगळ्यांनी मिळून काम केले पाहिजे. कचऱ्याचे लोकलाईज मॅनेजमेंट कसं करायचं ? याकडेच आमचे लक्ष असल्याचे वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले. 2017 पासून आतापर्यंत आपण कचऱ्याचे वर्गीकरण करत आहोत. तेव्हा आपण दहा हजार मेट्रिक टन कचरा उचलायचो, तो आता साडेसहा हजार मेट्रिक टनपर्यंत उचलत आहोत. हे सगळे मुंबईकरांचे यश असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.


2017 -18 मध्ये आपण प्लास्टिक बंदी आणली होती. केंद्र सरकारने प्लास्टिक बंदी आणली तर त्याचे प्रोडक्शन देशभरात बंद होईल असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई पालिकेच्या बजेटबाबत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, याबाबत मला काही बोलायचे नाही. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत त्यांना बोलायला काही नाही आणि आम्हालाही बोलायला काही नाही असे ते म्हणाले. मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये आम्ही शिक्षणासाठी वाढीव निधी दिलेला आहे. सोबतच पंधरा टक्के निधी हा हेल्थवर दिला आहे. प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत आपण माफ केला आहे. मुंबईकरांचा कर निघून गेला असल्याचं त्यांनी सांगितले.


बांद्रा हे निवडणुकीचे केंद्रस्थान आहे का ? असाही प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही कोणाच्या विरोधात लढत नाही, तर जे विषय समोर आहेत ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई पालिकेची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही. मुंबई महापालिकेचा केंद्रबिंदू हा मुंबईकर आहे, बाकी कोणी नाही असे ते म्हणाले. मुख्य गोष्ट म्हणजे आमचं काम बोलत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: