Kirit Somaiya  allegation on sanjay raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मोठा गोप्यस्फोट केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे भागिदार असलेली  लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वात नाही. तरीही कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला देऊन तब्बल शंभर कोटींचा जम्बो कोविड घेटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


"शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वात नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI,महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 






किरीट सोमय्या म्हणाले, हा घोटाळा गंभीर स्वरूपाचा असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  ऑथरिटीकडे  (NDMA)या   घोटाळ्याची  चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. 


दरम्यान, मागच्या महिन्यातही किरीट सोमय्या यांनी असाच गंभीर केला होता. "मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत.  बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी  800 बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून ज्या पद्धतीने टेरर घाबरवण्याचे काम करत आहेत ते का?  कारण कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. 


जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा नाही : अजित पवार 
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे कोणताही घोटाळा झालेला नाही. विरोधी पक्षातील लोक आरोप करत आहेत. पण पुढे त्याचं काय होतं? तर अनेकदा माफी मागून मोकळे होतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर दिले आहे. 


"जंबो कोविड सेंटर सध्या उभे आहे. पण त्यामधे रुग्ण नाहीत. मात्र, तरीही 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. कारण त्यासाठी भाडे द्यावे लागत आहे असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील कोरोना संपला असे अद्याप म्हणता येणार  नाही.  कारण अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले.


महत्वाच्या बातम्या


येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार - किरीट सोमय्या 


Nawab Malik : ED ने किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं का?; नवाब मलिक यांचा सवाल


किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, अब्रुनुकसानीचा खटल्यामध्ये जामीन रद्द करण्यासंदर्भात याचिका