मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी के जैन यांची नियुक्ती झाली आहे. ते आज सुनील मलिक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
अनेक वरिष्ठांना डावलून, डी के जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा 1983 च्या बॅचमधील ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगीळ, सुधीरकुमार श्रीवास्तव, दिनेश कुमार जैन,यू.पी.एस. मदान, संजीवनी कुट्टे आणि सुनील पोरवाल यांचा समावेश आहे.
मात्र ज्येष्ठता यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले दिनेश कुमार जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
25 जानेवारी 1959 रोजी जन्मलेले डी के जैन हे मूळचे राजस्थानचे आहे.
25 ऑगस्ट 1983 रोजी महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालेल्या जैन यांनी, एम टेक मॅकेनिक, एम बी ए अशा पदव्या मिळवल्या आहेत.