मुंबई : CBSE, ICSE बोर्डाच्या धर्तीवर राज्य सरकार आता आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार आहे. या निमित्ताने CBSE, ICSE बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे.


लवकरच याबाबत घोषणा केली जाणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.

SSC बोर्डचा अभ्यासक्रम काहीसा सोपा आहे. तर CBSE, ICSE बोर्डाचा कठीण आहे. त्यामुळे वेगळं आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करत दहावीच्या अभ्यासक्रमाची पातळी वाढवली जाणार आहे.

या वर्षी राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या 13 शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशा आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरु केल्या जातील किंवा काही शाळांना आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमात सामावून घेतलं जाणार आहे, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.