छगन भुजबळ म्हणाले की, "मी जगेन की नाही हे मला वाटत नव्हतं. पण मी सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो आहे. मला विश्वास बसत नाही." तसंच "माझ्यासोबत जे झालं ते मी कधीच विसरलो आहे. पण मी कोणासोबतही सुडबुद्धीचं राजकारण करणार नाही, माझ्यासोबत कोणी आकसाने वागलं म्हणून मी कोणाशी तसा वागणार नाही, असं स्पष्टीकरणही भुजबळांनी दिलं.
राज ठाकरे साहेब बोलत होते मला विरोधी पक्षासाठी मत द्या. तर देवेंद्र फडणवीस बोलायचे विरोधी पक्ष संपला आहे. आता आम्हाला विरोधक मिळाले आहेत. आम्ही जिथे चूकणार तिकडे तुम्ही सांगायचं. पण विरोधाला विरोध चालणार नाही, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
उद्धव ठाकरेंसह सात जणांचा शपथविधी
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी शपथ सुरु केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना शपथ दिली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करुन शरद पवारांच्या आदेशानुसार शपथ घेत असल्याचं सांगितलं.
संबंधित बातम्या
- महाविकासआघाडीच्या शपथविधी सोहळ्याच्या व्यवस्थेवर राज्यपाल कोश्यारी नाराज : सूत्र
- उद्धव ठाकरेंचा शपथविधी, राज ठाकरेंच्या आईंना अश्रू अनावर, उद्धवही भावूक
- 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'.. छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन शपथ घेतो की..
- उद्धव ठाकरेंसह सात जणांचा लक्षवेधी शपथविधी, शपथ घेताना 'यांचं' स्मरण
- महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठाकरे नतमस्तक; ऐतिहासिक क्षणांची खास दृश्य