या रुग्णामध्ये डेंग्यूसदृश लक्षणे दिसून येत होती. परंतु रक्ताची चाचणी केली असता, त्याच्या शरीरात हंता हा दुर्मिळ विषाणू आढळून आला. मुंबईत 2006 व 2010 मध्ये हंता व्हायरसचे विषाणू आढळून आले होते. कुत्रे, उंदिर-घुशी यांच्या मलमूत्रातून हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो, असे डॉक्टरांनी म्हणणं आहे.
हंता व्हायरचा आजार अतिशय दुर्मिळ आहे. अफ्रिका, कंबोडिया व दक्षिण पूर्व आशियातील काही देशांमध्ये या आजाराचे विषाणू आढळतात. हा विषाणू संपूर्ण शरीरावर हल्ला करतो. त्यामुळे फुप्फुसात रक्तस्त्रावही होतो.
हंता व्हायरसची लक्षणे
- हंता व्हायरसची लक्षणे दोन महिन्यांच्या आत दिसण्यास सुरुवात होते.
- थकवा येणे, ताप येणे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.
- याशिवाय डोकेदुखी, चक्कर येणे, थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या, अतिसार, आणि ओटीपोटात दुखणे आदी लक्षणेही दिसून येतात.
- या आजारात रुग्णाला खोकला आणि श्वासनास त्रास होऊ लागतो.