Maha Budget 2017: महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प
Maha Budget 2017: काय स्वस्त, काय महाग?राज्यावर सध्या एकूण किती कर्ज ?
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2017 05:15 PM (IST)
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभा आणि विधानपरिषदेत सादर करण्यात आला. 2017 – 2018 या आर्थिक वर्षासाठी 62 हजार 844 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. 38 हजार 892 कोटी रुपयांचा कर्ज राज्य सरकार यंदा काढणार आहे. एकूण 4 लाख 13 हजार 44 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर राज्याच्या डोक्यावर असणार आहे. दरम्यान, यंदा राज्याची महसुली तूट 4 हजार 511 कोटी रुपये अपेक्षित असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली तूट 3 हजार 644 कोटी रुपयांची अपेक्षित आहे. सुधारित अंदाजानुसार, महसुली तूट 14 हजार 377 कोटींपर्यंत जाणार असल्याची कबुली अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. अनावश्यक खर्चात बचत करुन, महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करुन ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. संबंधित बातम्या :