तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 प्लॉटमध्ये तारा नाइट्रेट या खासगी कंपनीत शनिवारी सात वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता, की कंपनीच्या इमारतीचा काही भाग कोसळून पडला. यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसतानाच कंपनीत उत्पादन घेण्याचे काम दोन दिवसापूर्वी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, या घटनेची दखल घेत गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच दोषींवर कारवाई करण्याच्या सुचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
स्फोटाने हादरला परिसर -
कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. या आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोट इतका भयंकर होता की कंपनीची इमारत कोसळली. स्फोटानंतर कंपनीत भीषण आगही पसरली. यामध्ये बाजूच्या इतर कंपन्यांना याची झळ पोहोचली. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत कंपनीचे मालक नटुभाई पटेल हे देखील होते. फायरब्रिगेडच्या पाच ते सात गाड्यांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली.
घटनेतील मृतकांची आणि जखमींची नावं -
मृतक - इलियाज अंसारी(40, निशु राहुल सिंह(26, माधुरी वशिष्ठ सिंह(46), गोलू सुरेंद्र यादव(19), राजमती देवी सुरेंद्र यादव(40), मोहन इंगळे(52)
जखमी - मुलायम जगत बहादुर यादव(23), राकेश कुमार, चेतराम जायसवाल (50), सचिन कुमार, रामबाबू यादव(18)रोहित वशिष्ठ सिंह(19), नटवरलाल बी.पटेल(56, प्राची राहुल सिंह (6)ऋतिका राहुल सिंह(3)
संबंधित बातमी - Tarapur Midc Blast | तारापूरमध्ये कंपनीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी
Tarapur Midc Blast | दोषींवर कठोर कारवाई करणार : मंत्री दादा भुसे | पालघर | ABP Majha