ठाणे : ठाण्याच्या विधान परिषदेच्या जागेवरुन चुरस वाढली असतानाच हितेंद्र ठाकूरांनी आपली सर्वच्या सर्व 135 मतं वसंतराव डावखरेंचा मिळणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं.
“मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला” असं हितेंद्र ठाकूर म्हटलं आहे. ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिबीर पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीनं वसंतराव डावखरेंना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने रवींद्र फाटक यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार दिला आहे. त्यामुळे या जागेसाठी चुरस वाढली आहे.
दरम्यान, मतांची संख्या कितीही असली तरी डावखरे निवडून येतात, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर डावखरेंसोबत चांगले संबंध नसलेला एकही नगरसेवक ठाण्यात नाही, असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं.