मुंबई : मुंबई-अहमदाबादच्या धर्तीवर लवकरच मुंबई-पुणे सुपरफास्ट ‘तेजस’ ट्रेन सुरु करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. गतिमानप्रमाणे थोडेसे जास्त पैसे भरुन बिझनेस क्लासच्या प्रवाशांना हा प्रवास करता येणार आहे.
तसंच देशातल्या प्रमुख शहरांदरम्यान काही नवीन गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यात तेजस, हमसफर आणि उदय या गाड्यांचा समावेश असल्याचं सुरेश प्रभूंनी सांगितलं.
मुंबईत हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर झालेल्या डीसी-एसी रुपांतर आणि 12 डब्यांच्या गाड्यांचं आज सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
दरम्यान, येत्या आठवड्याभरात हार्बर मार्गावरच्या सर्व लोकल 12 डब्यांच्या होणार आहेत.