Mumbai : मुंबई या स्वप्ननगरीत घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच घर जर मनापासून आवडीचं मिळालं तर त्यापेक्षा वेगळं सुख आणि समाधान नाही. याच मुंबईत (Mumbai) कामानिमित्ताने अनेक लोक येतात आणि भाड्याच्या घरात राहतात. नुकताच  मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या काळात केलेल्या अहवालातून असं समोर आलं आहे की, 2022 सालातील चौथ्या तिमाहीत (Q4) मुंबईतील भाड्याच्या जागांची मागणी (शोध) मागील तिमाहीच्या तुलनेत 13.9 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर जागांची उपलब्धता (लिस्टिंग) तीन टक्क्यांनी वाढली आहे. 


या अहवालातून असं समोर आलं आहे की, भाड्याने फ्लॅट घेण्याच्या जागांची मागणी मागील तिमाहीच्या तुलनेत (QoQ) 13.9 टक्क्यांनी घटली आहे. तर, भाड्याने देण्याच्या जागांच्या उपलब्धतेमध्ये (लिस्टिंग) तिमाहीच्या तुलनेत 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ऑफिसचं लोकेशन घरापासून जवळ असल्याने आणि प्रवासाच्या दृष्टीने अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व या ठिकाणी भाड्याचं घर घेण्याला लोकांची पसंती मिळतेय. 


या संदर्भात मॅजिकब्रिक्सचे सीईओ सुधीर पै म्हणाले, “2022 सालाच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये भारतातील भाड्याने दिल्या जाणाऱ्या घरांची बाजारपेठ स्थिरपणे पूर्वपदावर येत होती. या काळात भाड्याच्या घरांची मागणी शिखरावर पोहोचली होती. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर भाड्याच्या घरांची मागणी पुन्हा वाढणे अपेक्षितच होते. त्यात गृहकर्जावरील वाढते व्याजदर आणि आर्थिक अनिश्चिततता यांमुळे संभाव्य गृह खरेदी करणाऱ्यांना घर खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलून भाड्याच्या घरांना पसंती देण्यास प्रोत्साहन मिळाले असावे.”


मुंबईतील 45 टक्के भाडेकरू 2BHK फ्लॅटच्या शोधात
 
मॅजिकब्रिक्सच्या अहवालात असेही समोर आले आहे की, मुंबईतील सुमारे 45 टक्के भाडेकरू 2BHK घरांच्या शोधात आहेत. याचाच अर्थ त्यांचं प्राधान्य 2BHK फ्लॅटला आहे. यावरून छोट्या घरांना अधिक पसंती दिली जात असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. छोट्या आकारमानाच्या जागांची (500-1,000 चौरस फूट) मागणी आणि पुरवठा सर्वोच्च म्हणजे अनुक्रमे 52 टक्के आणि 42 टक्के आढळली आहे.


मॅजिकब्रिक्स : भारतातील पहिल्या क्रमांकाची प्रॉपर्टी साइट


मालमत्तेची खरेदी-विक्री करणाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने एकमेकांशी जोडून देणारा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म म्हणून मॅजिकब्रिक्सवर महिन्याला दोन कोटींहून अधिक जण भेट देतात आणि साइटवर 15 लाखांहून अधिक सक्रिय मालमत्तांचे लिस्टिंग आहे. गृहकर्ज, भाडे भरणे, मुव्हर्स अँड पॅकर्स, कायदेशीर सहाय्य, मालमत्तेचे मूल्यांकन आणि तज्ज्ञ सल्ला अशा 15हून अधिक सेवा मॅजिकब्रिक्स पुरवते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Dadar Fire : दादरमध्ये रहिवासी इमारतीला आग, चार तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात; लिफ्ट बंद असल्यामुळं अडथळा