या परिपत्रकानुसार, मुंबई आणि मुंबई उनगरामधील ज्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनामध्ये A/A+ प्राप्त आहेत, अशा 100 महाविद्यालयांमध्ये आता भागवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी 100 भगवदगीतेचे संच संबंधित महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यात आले आहेत.

अनेक महाविद्यालयांमध्ये या निर्णयाची चर्चा रंगली आहे. "शैक्षणिक संस्थामध्ये धर्मनिरपेक्षतेचं वातावरण असायला हवं. सरकारला या आदेशावर पुन्हा एकदा विचार करायला हवा," असं विद्यार्थी संघटनांचं मत आहे.
"जर उच्च शिक्षण विभागाने भगवदगीताऐवजी संविधानाचं वाटप केलं असतं तर चांगलं झालं असतं. सरकारने योग्य विचार करुन निर्णय घेतलेला नाही," असं रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष गाडे यांनी म्हटलं आहे.