पालघर: जोरदार पावसाने विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पालघर-डहाणू परिसरात जोरदार पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस वाहतूक विस्कळीत झाली होती.
डहाणूत आज प्रवाशांनी रेलरोको केला. अरावली एक्स्प्रेस डहाणूपर्यंतच सोडल्याने हा रेल रोको करण्यात आला. प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत सोडण्याचे रेल्वेने मान्य केलं. अखेर 20 मिनिटांनी रेलरोको मागे घेण्यात आला.
अरावली एक्स्प्रेस वांद्र्यापर्यंत जाते. मात्र पुढे पाणी भरल्याचे कारण देत डहाणू इथूनच गाडी पुन्हा परतायला लावल्यावर प्रवासी संतापले होते. त्यामुळेच प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली.
चर्चगेट-डहाणू रोडदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. डहाणू ते चर्चगेट वाहतूक वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाने विश्रांती दिली आहे. चर्चगेट-डहाणू रोडदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. तब्बल 48 तासानंतर डहाणू-चर्चगेट वाहतूक सुरळीत झाली आहे. मेल एक्स्प्रेस नियोजित वेळेनुसार धावणार आहेत.
पालघरमध्ये प्रवाशांचा संताप, 20 मिनिटे रेलरोको
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
12 Jul 2018 08:00 AM (IST)
प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत सोडण्याचे रेल्वेने मान्य केलं. अखेर 20 मिनिटांनी रेलरोको मागे घेण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -