Hemant Nagrale on Sachin Vaze Case सचिन वाझे प्रकरणाला गंभीर वळण मिळत असतानाच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. ज्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्त झाले. आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक परिषद घेतली. 


सध्याच्या घडीला मुंबई पोलीस ज्या परिस्थितीतून जात आहे, त्यावर प्रतिक्रिया देत राज्य शासनानं आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल नगराळे यांनी आभार व्यक्त केले. यानंतर त्यांनी थेट सचिन वाझे प्रकरणाला हात घालत दोषींवर कारवाई होणारच ही बाब स्पष्ट करत आपल्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. सध्याच्या घडीला पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित करत सर्वांकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली.


जो कुणी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई होईल असं म्हणत वाझे प्रकरणात योग्य तो तपास होणार असल्याची हमी त्यांनी दिली. वाझे प्रकरणात एनआयए, एटीएस जो तपास करत आहे तो योग्यरितीने होईल याची खात्री आहे, असंही ते म्हणाले. 


Parambir Singh | मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी






दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता परमबीर सिंह यांची बदली झाली आहे. त्यामुळं राज्याच्या पटलावर ही एक मोठी घडामोड समजली जात आहे.