Mumbai News : सध्याच्या जीवनशैलीमध्ये पाहिल्यास मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण वाढत चालले आहे. बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा असलेला अभाव यामुळे अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे मधुमेहाच्या रूग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पण मधुमेह नेमका का होतो? त्यामागील लक्षणं आणि कारणं कोणती? तसेच, यावर उपचार काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आरोग्याकडे दुर्लक्ष करणं मुख्य कारण
रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बरेच लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याचं एका रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं आहे. वेळेवर झोपणं, बाहेरचं अन्न खाणं आणि गोड पदार्थांचा अतिरेक या कारणांमुळे मुंबईत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच, कामाच्या ताणामुळे अनेकजण आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत, यामुळेही मधुमेहाचा वाढता धोका संभवतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचं
मधुमेहाची समस्या भारतात सातत्याने वाढत आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. मधुमेह पूर्णपणे नाहीसा करता येत नाही पण तो निश्चितपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. हिवाळ्यात मधुमेहाची समस्या वाढत आहे. बदलत्या ऋतूमध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी स्वत:ची अतिरिक्त काळजी घेणं गरजेचं आहे.
मधुमेहावर योग्य उपचार काय?
मधुमेहाचा उपचार हा रक्तातल्या साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. याबरोबरच योग्य आहार आणि पत्थ्य पाळणे, व्यायाम करणे हेदेखील खूप गरजेचे आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य वेळेस उपचार सुरु केल्यास मधुमेह आटोक्यात येऊ शकतो. ज्यांना हा आजार 8-10 वर्षांपेक्षा अधिक काळ असतो किंवा रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यांना इन्सुलिनची ट्रीटमेंट घ्यावी लागते.
मधुमेह होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्याल?
बऱ्याच लोकांच्या मनात चुकीचा समज आहे की, मधुमेह हा फक्त अनुवंशिक आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेह हा कोणालाही होऊ शकतो. मधुमेहाला टाळण्यासाठी अधूनमधून शुगर तपासत राहणे, आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढविणे, दिवसातून एक-दीड तास व्यायाम करणे, आहारात कार्बोहायड्रेट वाढवणारे पदार्थ खाणे. जसे की, चपाती, भाकरी, भात यांचे प्रमाण कमी करून डाळी, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, फळं इत्यादींचा जास्तीत जास्त समावेश करणे.
महत्त्वाच्या बातम्या :