मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहाता अनेकांनी गावची वाट धरली आहे. मात्र, शहरातून येणाऱ्या लोकांना ग्रामस्थांकडून विरोध होताना दिसत आहे. आपलं राज्य सुसंस्कृत राज्य आहे. त्यामुळे गावात आलेल्या नागरिकांसोबत माणुसकीचं वर्तन झालं पाहिजे, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. गावात येणारी माणसंही आपलीच आहेत. ते कोणत्याही बाधित देशातून आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याशी सौजन्याने वागण्याची विनंती टोपे यांनी केली. राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुढीपाडवासणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.


कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून सरकारने राज्यात सोमवारी संचारबंदी लागू केली. मात्र, शहरी भागात अजूनही गर्दी कमी होताना दिसत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्याला ऐकमेकांमध्ये अंतर राखणं गरजेचं आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांचे पालन करण्यासही त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांत गावाकडे जाणाऱ्या लोकाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे गावाकरी अशा लोकांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. तर, अनेक ठिकाणी गावांनी आपल्या सीमा बंद केल्याचे पाहायला मिळाले आहे. यावर गावात आलेले लोक पण आपलेच आहेत. त्यांच्याशी माणुसकीने वागण्याचा सल्ला राजेश टोपे यांनी दिला. अशा लोकांमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जावं पण गावात येऊन देणार नाही, अशी भूमिका घेणं हे राज्याला शोभणारं नसल्याचं त्यांनी सांगितले.


Corona Death | मुंबईत कोरोनाचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


कोरोनाशी लढण्यासाठी हजारहून अधिक रुग्णालयं सज्ज
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी हजारहून अधिक सरकारी आणि खासगी रुग्णालये सज्ज झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. सोबतच काही स्वयंसेवी संस्था आता मदतीसाठी पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, अशा परिस्थिती नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गावाकडील आणि शहरी भागातील खासगी डॉक्टरांनी ओपीडी केली हे योग्य नाही. आम्ही अत्यावश्यव सेवांमध्ये रुग्णालयांना वगळलं आहे. लोक आजारी पडू शकतात. त्यांना गरज पडू शकते, सर्व रुग्णांना उपचार करावे, अशीही विनंती टोपे यांनी केली.


#CoronaEffect | अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा नागरिकांना मोठा दिलासा; आयकर भरण्याला मुदतवाढ


गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
हिंदू धर्मातील आणि विशेष म्हणजे मराठी नववर्षाची उद्या सुरुवात होत आहे. उद्या गुढीपाडवा आहे. नूतन वर्षाची सुरुवात संकल्पाने करून कोरोना विषाणूवर विजय मिळवू. आपल्याला या संकटाला दूर ठेवायचं असेल तर स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. मीच आहे माझा रक्षक, मी घरी राहणार हा संकल्प उद्याच्या दिवशी सर्वांनी मिळून करू.


#Corona Threat | गावाकडे जाण्यासाठी ट्रकमागे लटकून जीवघेणा प्रवास, कोरोनाची भीती