Mumbai Crime : मुंबईतील हाजीअली दर्ग्याच्या कार्यालयात फोन करुन दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी देणाऱ्यास ताडदेव पोलिसांनकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हरियाणातून 36 वर्षीय तरुणाला अटक केली असून पवन कुमार मिश्रा असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


आयपी अॅड्रेस ट्रेस करत पोलिसांनी आरोपीला उचलले 


पवनकुमार मिश्राने हाजी अली दर्ग्याच्या ट्रस्ट कार्यालयात 25 सप्टेंबर रोजी फोन करून मस्जिदमध्ये बॉम्ब ठेवला असून पैशांची मागणी करत शिवीगाळ केली होती. त्यानंतर आयपी अॅड्रेस ट्रेस करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी बुधवारी पवनकुमार मिश्राला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


दारूच्या नशेत पवनकुमार मिश्राने हा फोन केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, आरोपीचे कोणत्या समाज कंठकांशी संबंध आहेत? याचाही तपास करत आहेत. ताडदेव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. 


हाजीअली दर्ग्याच्या कार्यालयात फोन करुन कोणती धमकी देण्यात आली होती?


आरोपीने 26 सप्टेंबर रोजी हाजीअली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. यानंतर हाजीअली दर्ग्याचे ट्रस्टी अधिकारी मोहम्मद ताहिर शेख पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी बॉम्बे स्कॉड घेऊन हाजी दर्ग्यात तपास सुरु केला होता. मात्र, पोलिसांना  कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. दरम्याने आरोपीने दारुच्या नशेत कॉल केला असल्याचे सांगितले आहे. तर इंटरनेटवरुन हाजी अली दर्ग्यातील कार्यालयाचा नंबर मिळवल्याचेही त्याने सांगितलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती