मुंबई : चौकशीच्या नावाखाली प्रवाशांना लुटणाऱ्या रेल्वे स्थानकावरच्या पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर परराज्यातून येणारे प्रवासी जीरआपी पोलिसांचे सावज ठरत आहेत.

 
नवख्या प्रवाशांना हेरुन हे पोलीस चौकशीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळतात. इतकंच नाही तर एखाद्या प्रवाशानं पैसे देण्यास नकार दिल्यास त्याला मारहाण करण्यात येते, अशा तक्रारी देखील ऐकायला मिळत होत्या.

 
जीआरपी पोलिसांची ही लूट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे पोलिसांचं बिंग फुटलं, मात्र रेल्वे प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.