मुंबई : शासकीय कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याबाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. विधानपरिषदेत आज याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते.


पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आली. ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला देईल. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले की, "365 दिवसांपैकी 52 रविवार, 26 दुसरा शनिवार-रविवार, चौथा शनिवार-रविवार अशा आपण साधारण हक्काच्या 78 सुट्ट्या आणि इतर सुट्ट्या मिळून 132 सु्ट्ट्या देतच आहोत. पण यापेक्षाही जास्त सुट्ट्या द्यायच्या का, यासंदर्भात अभ्यास करतोय. जास्त सुट्ट्या दिल्या तर त्याचा कामावर परिणाम चांगला होईल की काय होईल हे पाहावं लागेल. पाच दिवसांच्या आठवड्याबद्दल जो काही सकारात्मक निर्णय आपल्याला घेता येईल, तो आपण करु."

पाहा व्हिडीओ