महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश असून, या मार्गावर अवघ्या अडीच हजार रुपयात प्रवास करता येणार आहे.
नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची आज घोषणा केली.
'उडाण' या योजनेनुसार एक तासाचा हवाईप्रवास अवघ्या अडीच हजार रुपयात करता येईल.
महाराष्ट्रातील हवाई मार्ग
- नांदेड- मुंबई - (जून- 2017)
- नांदेड - हैदराबाद- (जून- 2017)
- नाशिक (ओझर) - मुंबई (सप्टेंबर- 2017)
- नाशिक (ओझर) - पुणे (सप्टेंबर- 2017)
- कोल्हापूर - मुंबई (सप्टेंबर- 2017)
- जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
- सोलापूर - मुंबई (सप्टेंबर- 2017)
'उडाण'च्या नियम व अटी
या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीट या अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल.
म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल.
उडाण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच गुंतवणूक वाढेल असा विश्वास नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला.
https://twitter.com/Ashok_Gajapathi/status/847347953740140545
https://twitter.com/Ashok_Gajapathi/status/847348122162315266
https://twitter.com/Ashok_Gajapathi/status/847348148737527808
संबंधित बातम्या