मुंबई विमानतळावर 63 लाखांचं दोन किलोपेक्षा जास्त सोनं जप्त
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 02:34 PM (IST)
NEXT PREV
मुंबई : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून दोन किलोपेक्षा जास्त सोनं जप्त करण्यात आलं आहे. एअर इंटेलिजन्स युनिटनं दुबईवरुन येणाऱ्या विमानातून हे सोनं ताब्यात घेतलं आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 63 लाख इतकी आहे. विमानाच्या सीटमधल्या एका पोकळ पाईपमधून हे सोनं बेकायदेशीररित्या भारतात आणलं जात असल्याची महिती मिळाली होती. त्यानुसार एअर इंटेलिजन्स विभागानं ही कारवाई केली. प्रत्येकी 116 ग्रॅमची 20 सोन्याची बिस्किटं आणि एक सोन्याचं नाणं या कारवाईत जप्त करण्यात आलं. मात्र या प्रकरणी अद्याप कुणाविरोधातही गुन्हा दाखल झालेला नाही.