मुंबई :  अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain)  मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात ज्या जागेवर हे अनधिकृत होर्डिंग उभं करण्यात आलं होतं ती जागा नेमकी कोणाची असा प्रश्न कालपासून विचारला जातोय, याचा पाठपुरावा एबीपी माझानं केला आहे.  ज्या जागेवर कोणतीही नियम न पाळता हे अनधिकृत होर्डिंग (Ghatkopar Hording)  उभं करण्यात आलं होतं ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे, जो पेट्रोल पंप या ठिकाणी चालवण्यात येतात तो देखील रेल्वे पोलिसांचा होता, या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या सगळ्या रेवेन्यू हा रेल्वे पोलिसांना आणि काही प्रमाणात पेट्रोल पंप चालवत असलेल्या मालकाला जात होता, ही अतिशय धक्कादायक अशी माहिती आता समोर आलेली आहे. तसंच  हे होर्डिंग अनधिकृत आहे नियम धाब्यावर बसवून उभारले जात आहे याची कल्पना रेल्वे पोलिसांना नव्हती का? असाही सवाल आता उपस्थित होतोय.


घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात मृतांचा आकडा 14 वर गेला आहे.  ज्या जागेवर हे अनधिकृत होर्डिंग उभं करण्यात आलं होतं ती जागा नेमकी कोणाची असा प्रश्न कालपासून विचारला जातोय. या होर्डिंग प्रकरणावरुन मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेत जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या जमीनीवर होर्डिंग उभं होतं ती जमीन कोणाच्या मालकीची आहे यावरुन वाद सुरु झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने अपघातग्रस्त होर्डिंग ज्या जमीनीवर उभं होतं ती जमीन आपल्या मालकीची नसल्याचं सांगत हात वर केले आहेत. ही जमीन रेल्वे पोलिसांच्या अख्त्यारीत येत असल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने केला. तर  होर्डिंग रेल्वेच्या जमीनीवर नव्हतं. या प्रकरणाशी भारतीय रेल्वेचा कोणताही संबंध नाही, असे रेल्वेने म्हटलं आहे. 


दुर्घटना घडलेली जागा रेल्वे पोलिसांची


आता रेल्वे आणि महापालिकेत जुंपली असताना  याचे उत्तर आम्ही शोधले आहे. ज्या जागेवर कोणतीही नियम न पाळता हे अनधिकृत होर्डिंग उभं करण्यात आलं होतं ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे, जो पेट्रोल पंप या ठिकाणी चालवण्यात येतात तो देखील रेल्वे पोलिसांचा होता, या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या सगळ्या रेवेन्यू हा रेल्वे पोलिसांना आणि काही प्रमाणात पेट्रोल पंप चालवत असलेल्या मालकाला जात होता, ही अतिशय धक्कादायक अशी माहिती आता समोर आलेली आहे.


अनधिकृत होर्डिंग पडल्याने झालेल्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?


जर पेट्रोल पंपमधून मिळणारे उत्पन्न रेल्वे पोलिसांना जात होते तर त्यांच्या जागेवर तयार करण्यात आलेल्या होर्डिंगचे उत्पन्न देखील रेल्वे पोलिसांना मिळत असण्याची शक्यता सांगितली जात आहे, पण प्रश्न हा उडतो की जर उत्पन्न रेल्वे पोलिसांकडे जात असेल तर अनधिकृत होर्डिंग पडल्याने झालेल्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? हे होर्डिंग अनधिकृत आहे नियम धाब्यावर बसवून उभारले जात आहे याची कल्पना रेल्वे पोलिसांना नव्हती का? हे होर्डिंग उभे राहिल्यानंतर तरी रेल्वे पोलिसांनी काय कारवाई केली? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत, ज्याचे उत्तर रेल्वे पोलिसांनी देणे आवश्यक आहे. हे पेट्रोल पंप रेल्वे पोलिसांचे होते.


Video :