Kirit Somaiya : मुंबई पोलिसांनी (Mumbai Rain) 3243 पानांची चार्जशीट घाटकोपर होर्डिंग प्रकरणात (Ghatkopar hoarding case) दाखल केली आहे. यात पोलिसांनी लिहिले आहे की रेल्वे पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे झाले आहे. त्यामुळं कैसर खालिद यांच्यावर 304 अ अंतर्गत कारवाई व्हावी असे सोमय्या म्हणाले.   या चार्जशिटमध्ये 40 बाय 40 साईज होती. यात एकच होर्डिंग असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. नंतर हे 209 फूट बाय 165 फूट झाले आहे. यातील अनेक पुरावे आम्ही दिल्याचे सोमय्या म्हणाले. कैसर खालिदांच्या पत्नीच्या बँक खात्यात भावेश भिंडेने 40 लाख टाकल्याचे सोमय्या म्हणाले. 


कैसर खलिदने भावेश भिंडेला जेवढे मोठे लावायचे तेवढे लाव असे सांगितल्याचे सोमय्या म्हणाले. कैसर खालिद हा फुटावर लाच घेत होता असेही ते म्हणाले. आधी ई निविदा काढायची त्यावर महाराष्ट्र शासन लिहायचे असे ते म्हणाले. दोन वेळा निविदा काढल्या होत्या. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना जानेवारी 2020 मध्ये निविदा काढली होती. हाऊसिंगचे आरक्षण रद्द करुन पेट्रोल पंप चे आरक्षण केले होते. यात चार कंपन्यांचे निविदा आल्या ज्यात तीन कंपन्या बोगस आहेत असेही सोमय्या म्हणाले. 


भावेश भिंडेने कैसर खालिदाच्या पत्नीच्या अकाऊंटला 40  लाख रुपये टाकले 


सुनील राऊत यांनी भिंडेला सांगितले होते की, सेंगावकर यांची बदली केली, कैसर खालिदला भेटा असेही सोमय्या म्हणाले. व्हीजेटीआयने अहवाल दिल्याप्रमाणे 158 किलो मीटर प्रति तास प्रमाणे मुंबईत होर्डिंग हवी. भावेश भिंडेने 40 लाख काढले होते. हे पैसे मोहम्मद खानला दिले आणि त्याने ते पैसे कैसर खालिद याच्या पत्नीच्या अकाऊंटला पाठवल्याचे सोमय्या म्हणाले. दादर हॉर्डिगमध्ये 37 लाख रुपये घेतले आहेत. अमेरिका टूर केली ती स्पॉन्सर होती. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे हा खालिद बाहेर का आहे? सुनील दळवीवर पालिका कारवाई का करत नाही? याबाबत मी फडणवीस यांची भेटणार असल्याचे सोमय्या म्हणाले.


13  मे रोजी होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता


मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी मे महिन्यात भलं मोठं होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरुन आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. 13  मे रोजी होर्डिंग कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये एकूण 80 लोक जखमी झाले होते.


महत्वाच्या बातम्या:


Thane News : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न, होर्डिंग मालकांना पालिकेची नोटीस