Gautami Patil, Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्या माध्यमातून अंधेरी पश्चिमेला चार दिवसीय खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. रविवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपली उपस्थिती लावली,यावेळी कुशल धुरी यांच्या वाढदिवस निमित्ताने गौतमी पाटील हिचे हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचसोबत गौतमी पाटील तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंधेरीकरांनी गर्दी केली. गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला. यावेळी गौतमीच्या नृत्यावर अंधेरीकर थिरकल्याचे देखील पाहायला मिळाले. लहान थोरापासून सर्वच प्रेक्षकांनी यावेळी गौतमीच्या नृत्याचा आस्वाद घेतला.












दरम्यान, गौतमीचा डान्स पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी once more ची मागणी केली होती. त्यानंतर गौतमीने once more पेक्षा चांगलं करुन दाखवते म्हणत सर्वांना Love You म्हटलंय. यावेळी गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी अंधेरीतील लोकांनी तुफान गर्दी केली होती.