Ganeshotsav Mumbai Traffic Updates : मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणरायाचं आगमन केलं जात आहे. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा केला जात आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) गणेशोत्सवासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 


आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) घराघरांत गणरायाचं आगमन झालं आहे. अशातच उद्यापासून गणेश विसर्जनाला सुरुवात होणार आहे. उद्या दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर त्यानंतर तीन दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, सात दिवसांचे गणपती, तर अनंतर चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं विसर्जन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 1, 4, 5, 6 आणि 9 सप्टेंबर रोजी विसर्जन केलं जाणार आहे. त्यानिमित्त वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबईकरांची सुरक्षितता लक्षात घेऊन तसेच, गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गांमध्ये बदल केला जाणार आहे. 


लालबागमध्ये होणारी गणेश भाविकांची गर्दी लक्षात घेता. तेथील वाहतूकही पर्यायी मार्गांवरुन वळवण्यात आल्याचं वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दादर, माहीम, सायन, माटुंगा, परळ, लालबाग, भायखळा येथील काही ठिकाणांवरील वाहतूक पर्यायी ठिकाणांवरुन वळवण्यात आली आहे. 



मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार, 1 सप्टेंबरपासून सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवजड वाहतांना काही ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, "ग्रेटर मुंबईमध्ये 1 सप्टेंबर, 4, 5 आणि 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आणि 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत रस्त्यांवर अवजड वाहानांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे."


"बृहन्मुंबईतील वाहतूक कोंडी, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि गणपती मिरवणुका सुरळीत ठेवण्यासाठी, 1, राज टिळक रोशन, LPS. पोलीस उपायुक्त (11.प्र. आणि मध्य) वाहतूक, मुंबई कवायतीत बॉम्बे मोटार व्हेईकल ACI-1988 (1988 चा कायदा 39) च्या कलम-115 अन्वये मला बहाल केलेला अधिकार, 19 मे 1990 रोजीच्या सरकारी अधिसूचना क्रमांक MVA 0589 CRR-1061/TRA-2 सह वाचलेला आदेश खालीलप्रमाणे आहे." , असं सांगण्यात आलं आहे.