मुंबई : गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून लॉटरी (CIDCO  Lottery 2022) जाहीर करण्यात आली आहे. उद्या 4 हजार 158 घरांची आणि 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली आहे. ॲानलाईन पध्दतीने ही लॅाटरी काढली जाणार आहे. सिडको महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील (Navi Mumbai) द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील   घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 


मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील 4158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यातील 403 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता राखीव आहेत. तर उर्वरित 3754  घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडको एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास 25 हजार घरे सिडकोने विकली आहेत. सिडको घरांच्या किंमती आवाक्यात असल्याने आर्थिक दुर्बल घटकासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे


सिडको सातत्याने घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची (कमर्शियल प्रीमाईसेस) विविध योजनांद्वारे विक्री करते. ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर असलेल्या नवी मुंबईत नागरिक, व्यापारी आणि विकासक यांना त्यांची घरे, कार्यालये, व्यावसायिक गाळ्यांची मालकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.


महागृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा सहा लाख रूपये तर अनुदानाची रक्कम दोन लाख 50  हजार  निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत.


इतर योजनांतर्गत सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तारांकीत हॉटेलसाठी 1, निवासी वापरासाठी 64 तर निवासी तथा वाणिज्यिक वापरासाठी पाच भूखंड विक्रीकरीता उपलब्ध आहेत.