Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज नवे 235 कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) काहीशी अधिक आहे, कारण सोमवारी 192 नव्या बाधितांचीच नोंद झाली होती. पण आज मुंबईत एकाही रुग्णाचा मृच्यू न झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 235 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 446 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 301 इतकी झाली आहे. 


याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन 0.04% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसंच आज नव्याने सापडलेल्या 192 रुग्णांपैकी 38 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 853 बेड्सपैकी केवळ 972 बेड वापरात आहेत.



कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला


पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1930 दिवसांवर आला आहे. सोमवारच्या तुलनेत 239 दिवसांची वाढ यामध्ये झाली आहे. कारण सोमवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1691 इतका होता. दरम्यान हा कालावधी वाढत असल्याने पालिकेसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


 इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha