मुंबई: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा पराक्रम आजही कायम आहे. या महिन्यात सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाली. पेट्रोल आज 39 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 87 रुपये 77 पैशांवर तर डिझेल 76 रुपये 98 पैशांवर पोहोचला आहे. सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 89.57 रुपये लिटर आहे.
तर दुसऱ्या नंबरवरील अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर तब्बल 89.03 रुपये इतका आहे. शंभरी गाठायला आता फक्त 11 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूही 5 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
काल पेट्रोल 48 पैशांनी, तर डिझेल 55 पैशांनी महागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे.
या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये विरोधीपक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनीदेखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं.
7 दिवसात पेट्रोल 1 रु 69 पैशांनी महागलं
गेल्या सात दिवसात पेट्रोल सातत्याने महागतंय. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 87.77 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1 रुपये 69 पैशांची वाढ झाली आहे.
महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
परभणी - पेट्रोल - 89.57, डिझेल 77.53
मुंबई – पेट्रोल – 87.77, डिझेल – 76.98
पुणे – पेट्रोल – 87.57, डिझेल – 75.60
ठाणे – पेट्रोल - डिझेल -
नाशिक – पेट्रोल -88.15, डिझेल – 76.16
औरंगाबाद – पेट्रोल - 88.82, डिझेल – 78.04
नागपूर – पेट्रोल - 88.26, डिझेल – 77.50
कोल्हापूर - पेट्रोल - 87.95, डिझेल – 75.99
सोलापूर – पेट्रोल - 88.82, डिझेल – 77.60
अमरावती – पेट्रोल – 89.03, डिझेल – 78.27
सिंधुदुर्ग – पेट्रोल – 88.69, डिझेल – 76.70
अहमदनगर – पेट्रोल – 87.62 डिझेल – 75.66
पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याची गरज
पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणाय़ला हवं असं मत केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. इंधन दरवाढीमुळं लोकांना त्रास सहन करावा लागतोय याची जाणीव असल्याचंही प्रधान म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरण्यामागंही इंधनदरवाढ हे महत्वाचं कारण असल्याचं धर्मेंद्र प्रधानांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
पेट्रोल-डिझेलची लांब उडी, इंधन दरात मोठी वाढ
पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!
पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल
इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच
डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं