मुंबई : नोकरीमध्ये चार दिवसांच्या आठवड्यासंबंधी केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र एकीकडे विचार सुरु असताना मुंबईतील एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी टीएसी सिक्युरिटीजने (TAC Securities) कर्मचाऱ्यांकडून चांगल्या उत्पादकतेसाठी (Productivity) गेल्या 7 महिन्यांपासून 4 दिवस कामकाजाचे सुरु केले. म्हणजेच कमर्चाऱ्यांना शुक्रवार, शनिवार, रविवार अशी तीन दिवस सुट्टी असते. कंपनीने म्हटले की जर असे केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादकता चांगली होत असेल तर मुंबई कार्यालयात चार दिवसांचा आठवडा कायमस्वरूपी केला जाईल.


टीएसी सिक्युरिटीज कंपनीमध्ये सुमारे 200 कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची हेल्दी वर्क लाईफ आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. एका आयटी कंपनीने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 80 टक्के टीम आठवड्यातून 4 दिवस जास्त तास काम करण्यास इच्छुक आहेत. तर कर्मचारी त्यांच्या पर्सनल लाईफ आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दीर्घ वीकेंड शोधत आहेत. अनेक कर्मचारी विविध अभ्यासक्रम आणि उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.


टीएसी सिक्युरिटीजचे सीईओ आणि संस्थापक त्रिशनीत अरोरा म्हणाले की, चांगली उत्पादकता आणि क्वालिटी राखण्यासाठी हे पाऊल आहे. आम्ही आमच्या कर्मचार्‍यांचे आरोग्य आणि कल्याण प्रथम ठेवले आहे. आमची कंपनी तरुण कर्मचाऱ्यांची कंपनी आहे आणि कर्मचारी ज्या पद्धतीने काम करतात त्यासह प्रयोग करू शकतो. 


दिलेल्या वेळेत कंपनीची जास्तीत जास्त उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी हे केले गेले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास त्यांच्या घरापर्यंत पोहोचू नयेत याचीही खात्री करण्यात आली आहे. प्रत्येकाने घरी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, असं सीईओ आणि संस्थापक त्रिशनीत अरोरा म्हणाले. 


इतर बातम्या