Multibagger Stock : गेल्या एका महिन्यात बीएसई सेन्सेक्स 7 टक्क्यांहून अधिक वाढल्याने बाजार तेजीत राहिला आहे. बीएसई रियल्टी इंडेक्स, बीएसई टेलिकॉम इंडेक्स, बीएसई एनर्जी इंडेक्स आणि बीएसई कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्सचा ग्राफ या कालावधीत वर होता. बीएसई रियल्टी इंडेक्स टॉप मंथली सेक्टोरल गेनर राहिला. गेल्या एका महिन्यात अनेक शेअर्सनी बीएसई सेन्सेक्सवर चांगली कामगिरी केली. किमान 44 स्टॉक असे आहेत जे एका महिन्यात दुप्पटपेक्षा जास्त वाढले. म्हणजे बँकेत पैसे डबल होण्यासाठी साधारण 12-15 वर्ष लागतात. मात्र काही स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट झाले आहेत. यातील सर्वाधिक वाढलेले 10 स्टॉक कोणते याबद्दल माहिती घेऊयात.
1. बीपीएल लिमिटेड (BPL Ltd) इलेक्ट्रिकल सेक्टरचा हा स्टॉक एका महिन्यात 175.03 टक्क्यांनी वधारला आहे. या स्टॉकची 27 ऑगस्ट रोजी किंमत 35.85 रुपये होती जी 62.75 रुपयांनी वाढून 98.60 रुपये झाली आहे.
2. प्लॅस्टिक प्रॉडक्ट्स सेक्टरमधील गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेडचा (Gopala Polyplast Ltd) स्टॉक एका महिन्यात 152.42 टक्क्यांनी वाढला आहे. या स्टॉकची किंमत 27 ऑगस्ट रोजी 233.70 रुपये होती. जी 356.20 रुपयांनी वाढून 589.90 रुपयांपर्यंत आली आहे.
3. आयटी स्टॉक कॉन्टिनेंटल केमिकल्स लिमिटेडमध्ये (Continental Chemicals Ltd) एका महिन्यात 152.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 27 ऑगस्ट रोजी 136.10 रुपयांना होता. जो महिनाभरात 207.15 रुपयांना वाढून 343.25 रुपयांवर आला आहे.
4. फायनान्स स्टॉक सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेडनेही (Sindhu Trade Links Ltd) चांगली कामगिरी केली. या स्टॉकमध्ये एका महिन्यात 152.05 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 27 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 111.05 रुपये होती. जी महिनाभरात 168.85 रुपयांनी वाढून 279.90 रुपयांवर आली आहे.
5. जेआईटीएफ इंफ्रालॉजिस्टिक्स लिमिटेड (JITF Infralogistics Ltd) स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात 151.47 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 64.60 रुपये होती. जी 97.85 रुपयांनी वाढून 162.45 रुपयांवर आली आहे.
6. फायनान्स स्टॉक TTI Enterprise Ltd मध्ये 151.55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 11.29 रुपये होती. जी महिनाभरात 17.11 रुपयांनी वाढून 28.40 रुपयांवर गेली आहे.
7. गेल्या एक महिन्यात आदिनाथ टेक्सटाइल्स लि.चा (Adinath Textiles Ltd) शेअर 150.64 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी या शेअरची किंमत 35.09 रुपये होती. जी 52.86 रुपयांनी वाढून 87.95 रुपायंवर पोहोचली आहे.
8. चेन्नई फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडने (Chennai Ferrous Industries Ltd) गेल्या एका महिन्यात 150.60 टक्क्यांनी वाढ केली आहे. या शेअरची किंमत गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी 29.41 रुपये होती. जी महिनाभरात 44.29 रुपयांनी वाढून 73.70 रुपायंवर पोहोचली आहे.
9. बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडने (Bombay Wire Ropes Ltd) गेल्या एका महिन्यात 150.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या स्टॉकची किंमत गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी 24.51 रुपये होती. जी 36.79 रुपयांनी वाढून 61.30 रुपयांवर पोहोचली आहे.
10. एशियन पेट्रोप्रोडक्ट्स अँड एक्स्पोर्ट्स लिमिटेडचा (Asian Petroproducts & Exports Ltd) शेअर गेल्या एका महिन्यात 149.88 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरची किंमत गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी 20.91 रुपये होती. जी 31.34 रुपयांनी वाढून 52.25 रुपयांवर आली आहे.