मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

“अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमवला, पण ते सदैव आमच्या हृदयात राहतील.अटलजी अमर आहेत” अशी श्रद्धांजली उद्धव ठाकरेंनी वाहिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे आज रात्री दिल्लीकडे रवाना होत आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते.

वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं.  जिंदादिल राजकारणी,  हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.

संबंधित बातम्या 

राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन  

अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी  

वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी 

हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार