कल्याण : उच्चशिक्षित तरुणींना मॅट्रिमोनी साईट्सवरून गंडा घालणाऱ्या एका ठगाला कल्याणच्या एमएफसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुभंकर बॅनर्जी असं त्याचं नाव असून तो गुगल आणि एटीएसचा हॅकर असल्याचं तरुणींना सांगायचा.
मूळचा कोलकात्याचा असलेला शुभंकर हा सध्या बंगळुरुमध्ये वास्तव्याला होता. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सवर तो स्वतःची नोंदणी करायचा आणि त्याद्वारे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा. यानंतर या तरुणींशी प्रेमाचं नाटक करुन आपल्याला पैशाची गरज असल्याचं भासवायचा आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा.
अशाप्रकारे कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमाचं नाटक करत त्याने तिच्यासोबत फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून तब्बल 6 लाख 86 हजार रुपये उकळले. हा त्रास वाढल्यावर संबंधित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार एमएफसी पोलिसांनी शुभंकरचा शोध घेत बंगळुरुमधून त्याला अटक केली.
शुभंकर बॅनर्जीने अशाप्रकारे आजवर 25 मुलींची फसवणूक केली असून त्यांच्याकडून 37 लाख रुपये उकळल्याची कबूली दिली आहे.
उच्चशिक्षित तरुणींना मॅट्रिमोनी साईट्सवरुन गंडा, बंगळुरुच्या तरुणाला बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2018 01:47 PM (IST)
लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सवर तो स्वतःची नोंदणी करायचा आणि त्याद्वारे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -