Anil Deshmukh Bail Update: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उच्च न्यायालयानं  मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay  High Court) जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयानं देशमुखांना जामीन मंजूर (High Court Grants Bail) केला आहे. तसेच, न्यायालयानं जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहेत. आठवड्यातून दोन दिवस देशमुखांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. 


Anil Deshmukh Bail: काही अटींसह अनिल देशमुखांना जामीन


अनिल देशमुखांना (Anil Deshmukh News) 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याता आला आहे. त्यांना त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा लागणार आहे. तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच, आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तपासात संपूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देश अनिल देशमुखांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. 


मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टानं अनिल देशमुखांना जामीन नाकारला होता. त्यानंतर देशमुखांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णीक यांच्यासमोर या प्रकरणासंदर्भात सुनावणी पार पडली. सोमवारपासून या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. देशमुखांच्या जामीनावरील निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. आज न्यायालयानं या प्रकरणावरील निकाल देत अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. 


दरम्यान, अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला तेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होतं. तब्बल 13 महिन्यांपासून अनिल देशमुख कारागृहात आहेत. 1 नोव्हेंबर 2021 रोजी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते, त्याचदिवशी ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अनिल देशमुख अटकेत होते. दरम्यानच्या काळात अनिल देशमुखांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या निर्दशानंतर सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणीही देशमुखांना अटक झाली होती. एकाच वेळी दोन तपास यंत्रणांच्या दोन गुन्ह्यांमध्ये देशमुख अटकेत होते. 


गेल्या महिन्यात अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयच्या प्रकरणात देशमुखांना जामीन मिळणं बाकी होतं. आज उच्च न्यायालयानं सीबीआयच्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 


पाहा व्हिडीओ : Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख 13 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर, 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन



Anil Deshmukh Bail: प्रकरण नेमकं काय? 


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे. 


Anil Deshmukh bail by Bombay High Court  HC grants bail to Maharashtra Former Home Minister and NCP leader  in a corruption case filed by CBI today