Sanjay Raut PC Today : शिवसेनेच्या (Shiv Sena) पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल मोदींनी (PM Modi) शिंदेंची पाठ थोपटली का, असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागपूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठ थोपटली. यावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर टीका केली. शिवसेना फोडल्याबद्दल मोदींनी शिंदेंची पाठ थोपटली का, असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. 


'छत्रपती शिवराय आणि बाळासाहेबांचा अपमान झाला'


राऊत म्हणाले, 'समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला. पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख मात्र बाळासाहेबांचा मान, सन्मान राखण्यासारखं वर्तन कुणीही केलं नाही. बॅनरमध्ये बाळासाहेबांचा फोटो चौथ्या क्रमांकावर होता. महाराष्ट्राला विकासाचे अकरा तारे दिले, असं पंतप्रधानांनी म्हटलं. ज्या अकरा ताऱ्यांसंदर्भात पंतप्रधानांनी भाषण केलं, त्यामधील पहिले दोन तारे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला.'


'सूर्यावर थुंकणारे त्या व्यासपीठावर होते'


समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवराय आणि बाळासाहेबांचा अपमान झाला, असं राऊतांनी म्हटलं. 'छत्रपती शिवाजी महाराज हे प्रखर सूर्य... त्या सूर्यावर थुंकणारे त्या व्यासपीठावर होते. हा त्यांचा अपमान आहे', असं संजय राऊतांनी म्हटलं. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा रविवारी नागपुरात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्र नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित होते. शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यपालाविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलनं आणि निषेध सुरु आहे.


Anil Deshmukh Bail : पाहा व्हिडीओ : अनिल देशमुख यांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार






पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदे यांची पाठ थोपटली


महाराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना कौतुकाची थाप दिली. शिंदे-फडणवीस सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे, असं म्हणत मोदींनी शिंदेचं कौतुक केलं.