मुंबई : मुंबईमधील पुलाची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये दिले जातील. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, तसेच जखमींवर पूर्ण उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 1988 मध्ये या पुलाची निर्मिती झाली. मुंबईतील पुलाच्या दुर्घटनेनंतर सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या ऑडिटमध्ये हा पूल सुस्थितीत असल्याचे सांगितले होते. प्रमाणपत्र देखील दिले होते. आता या ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही किरकोळ दुरुस्त्या या ऑडिटमध्ये सुचविल्या होत्या. या दुरुस्त्या वर्षभरापूर्वीच केल्या गेल्या होत्या. जर या पुलाचे चुकीचं स्ट्रक्चरल ऑडिट झाले असेल तर या पुलाचे ऑडिट करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, आणि या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, मृतांचा आकडा पाचवर, 34 जखमी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक 34 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू (35) , रंजना तांबे (40 ), जाहीद सिराज खान (32) यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेतील मृतक महिला जीटी हॉस्पीटलच्या कर्मचारी असल्याची माहिती आहे.


या पुलाचा जवळपास 60 टक्के स्लॅब रहदारीच्या रस्त्यावर कोसळल्याने एकच हाहाकार उडाला.





घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका पोहोचल्या असून पुलाच्या स्लॅबचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा पुलाचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या वेळेला खूप गर्दी असल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.





सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे


या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात जखमींना हलवलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनास्थळी   सध्या अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.  सीएसएमटी स्टेशनवर पुलाचा स्लॅब कोसळलेल्या घटनास्थळी पुढील काही वेळात पोहचेल अशी माहिती आहे.

टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेला हा पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला आहे. या पुलाचा कामा रूग्णालयानजीकचा भाग कोसळला आहे. या पुलावर असलेला क्राँक्रिट स्लॅब पूर्णपणे पडलं असून आता केवळ पुलाचा सांगाडा उरला आहे. सध्या घटनास्थळावरून गर्दी हटवणं हे सध्याचं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पुलाचा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथील गर्दी कमी करण्याचे काम सुरू आहे. ही गर्दी CST स्थानकाकडे हलवण्यात येत आहे.

पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी

दोन वर्षांआधीच स्थानिक नगरसेवकांनी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे यावेळी स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

याघटनेसंबधी पालिकेच्या स्थानिक नगरेसेविका सुजाता सानप म्हणाल्या की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती". त्यावर रेल्वेने उत्तर दिले आहे की, "हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे". मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन या घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. तसेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर याबाबत म्हणाले की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती."

दोन वर्षांपूर्वीच स्थानिक नगरसेवकांनी या पुलाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

यावर उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, हा पूल बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तरिदेखील आमचे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत आहे. रेल्वेचे डॉक्टर आणि अधिकारी घटनास्थळी असून जखमींची मदत करत आहेत.

नगरसेविका सानप म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोसळलेल्या पादचारी पुलाचं ऑडिट झाले नव्हते, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, म्हणूनच याला रेल्वे जबाबदार आहे,

परंतु रेल्वेने याप्रकरणी म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी या पुलाचे ऑडीट करुन आम्ही या पुलाची डागडुजी केली होती

या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. परंतु प्रशासन मात्र मुंबईकरांना टोलवाटोलवीची उत्तरं देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ पाहा



मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार
ज्या प्रशासनाकडे या पुलाची जबाबदारी होती. त्यांच्यावर मुंबई पोलीस सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत. पुलाचा काही भाग आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या अखत्यारित आहे. तर अर्धा भाग एम.आर.ए मार्ग पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


संबंधित बातम्या

पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी

मुंबई पूल दुर्घटना : मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री 

सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे 

बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका

पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप

'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे

रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली