कल्याण : कल्याणच्या (Kalyan Fire)  खडकपाडामधील आग लागलेल्या इमारतीतला एक व्हिडिओ समोर आलाय. इमारतीमधील नागरिक साडीच्या मदतीनं दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीत उतरून जीव वाचवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media)  होत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 


कल्याणमधील मोहन अल्टीज या इमारतीत तिसरा मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली होती.  या आगीची झळ आजूबाजूच्या दोन फ्लॅटला देखील बसली.  सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर या घटनेचा  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मधील  कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी साडीच्या आधर घेतला. साडीचा आधार घेत तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उतरताना दिसून आले. 


कल्याणच्या खडकपाडा भागात 23 मजली  मोहन अल्टीजा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये काल सकाळी अचानक आग लागली. या आगीची झळ दोन फ्लॅटला बसली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही . तिसर्‍या मजल्यावर लागलेली दोन संलग्न फ्लॅट पांडे कुटुंबीयांचे असून कुटुंबातील सदस्यांनी बाल्कनीतून साड्या बांधून दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीत उतरून आपला जीव वाचवला. 


पाहा व्हिडीओ



डोंबिवलीत पत्नीला जिवंत जाळले, दोन मुली गंभीर जखमी 


घरात आग लागल्यानं पती पत्नी आणि दोन मुली गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली होती. डोंबिवली (Dombivli Fire)  भोपर गावात घडलेल्या या घटनेत पतीनंच कौटुंबिक वादातून पत्नीला पेटवून दिल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी मानपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.  आगीत त्यांच्या दोन मुली देखील गंभीर जखमी झाल्या  तर निर्दयी पती प्रसाद देखील जखमी झाला होता. या चौघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झालाय. प्रीती पाटील असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी निर्दयी पती प्रसाद पाटील याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


डोंबिवलीतील 'ती' आग लागली नव्हती तर लावली; पतीनं पत्नीला पेटवून दिलं अन् बनाव रचला


Kalyan Navratri 2022 : कल्याणमधील पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरुवात; जाणून घ्या इतिहास