BJP Corporator Mulund : भाजपच्या मुलुंड येथील नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलांसह तिघांवर नवघर पोलीस ठाण्यात खंडणी आणि अपहरण इत्यादी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता नवघर पोलीस ठाण्यावरही आरोप होऊ लागले आहेत. यातील तीन आरोपींपैकी मनोज जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण निमितला पोलिसांनी सूट दिली आहे. याचाच फायदा घेऊन नमित फरार झाला आहे. त्यामुळे पोल
पालिकेच्या एका कंत्राटदराने हा गुन्हा दाखल केला आहे. केणी यांच्या विभागात असलेले एक काम ऑनलाइन टेंडरमध्ये त्या कंत्राटदारला लागले होते. मात्र हे टेंडर त्याने मागे घ्यावे म्हणून केणी यांचा मुलगा नमित केणी याने त्या कंत्राटदारला कार्यालयत बोलावून धमकावले आणि टेंडर मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर मनोज जाधव आणि गोविंद जाधव यांच्या मदतीने त्याला बळजबरीने पालिका टी विभागात नेण्यात आले. आणि तिथे कंत्राटमागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप या कंत्राटदारने तक्रारीत केला आहे. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा नमितची हळद होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न तर तिसऱ्या दिवशी सत्य नारायणाची पूजा होती. लग्नातील सर्व कार्यक्रमांना भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नेते देखील उपस्थित होते. मात्र तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली नाही. आणि आता नमितशी पोलिसांचा संपर्कच होत नाहीये. यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत नवघर पोलिसांवर आरोप केला असून आता किरीट सोमय्या गप्प का असा सवाल केला आहे.
या प्रकरणी सदर कंत्राटदार भीतीच्या छायेत असल्याने त्याने बोलण्यास नकार दिला आहे. रजनी केणी आणि त्यांचे पुत्र देखील कोणाचाच फोन उचलत नाहीयेत. तर नवघर पोलीस आणि संबंधित अधिकारी यांनी देखील कॅमऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. आम्ही सदर प्रकरणात नमितला नोटीस दिले असल्याचे आणि आता त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे पोलीसही संशयाच्या घेऱ्यात आले आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live