Maharashtra Farmers Protest LIVE UPDATES | भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा? , विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका

Farmers Protest LIVE UPDATES Azad Maidan | अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ अखेर काल रात्री मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला दुपारी हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jan 2021 11:33 PM
आझाद मैदान येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सकाळपासून येथील हजारो शेतकरी आंदोलनात शामिल झाले होते. आता हे शेतकरी निवांत झाले असून सकाळपासूनचा थकवा घालविण्यासाठी या ठिकाणी भजन, जागरण, गोंधळ गीतं शेतकरी गात आहेत. यात महिला देखील सहभागी झाल्या आहेत. उद्या हे सर्व शेतकरी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करून आपल्या गावाकडे जातील.
प्रवीण दरेकर यांच्या भेंडी बाजारातील महिला आंदोलनात सहभागी या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा आक्षेप, प्रवीण दरेकरांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते,
या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा दिला, या आंदोलनाला भाजप जसे भाडोत्री पैसे देऊन लोक आणते तशी लोक आणली नव्हती, चव्हाण यांची टीका
कृषी कायद्याविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. आजच्या मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते.'भेंडी बाजारातील महिला शेतकरी कधी पासून झाल्या ? अशी टीका परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.
राज्यपाल पळून गेले. आम्हाला अडवलं गेलं. पोलिस ही देखील शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांनाच आमच्या विरोधात उभं केलं आहे. शेतकऱ्यांचा अवमान केलं आहे राज्यपालांनी. आमच्याच भावांना आमच्या विरोधात उभं केलं आहे. अजित नवले यांचा आरोप.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील डाव्या विचारसरणीच्या सर्व पक्ष व संघटनांनी आज तिरंगा रॅली काढून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे तात्काळ रद्द करा अशी मागणी देखील यावेळी केली.तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आले 60 दिवसापासून दिल्लीच्या वेशीवर थांबलेल्या पंजाब आणि हरियानाच्य शेतकऱ्यांच्या पाठीशी देशभरातील शेतकरी आहे जोपर्यंत काळे कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील केंद्रसरकारने आतातरी शेतकऱ्याच्या हिताच्या बाजूने निर्णय घेत काळे मागे घ्यावेत अशी मागणी तिरंगा रॅली सहभागी झालेल्या नागरिकांनी केली बीड शहरातील महात्मा फुले चौकातून सुरू झालेली तिरंगा रॅली थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला
'माझी स्पष्ट मागणी आहे की, ऊसाला हमीभाव मिळतो, त्याप्रमाणे शेतीच्या प्रत्येक उत्पादनाला हमीभाव मिळाला पाहिजे'- जयंत पाटील (शेकाप)
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ढोंगी पक्ष : देवेंद्र फडणवीस
आजाद मैदानावर आलेल्या आदिवासींना डाव्या पक्षांनी दिशाभूल करुन आणलं आहे. आजाद मैदानातील मंचावर शरद पवार आणि बाळासाहेब थोरात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ढोंगी पक्ष आहेत.
शरद पवारांना सर्व सत्य माहित आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून करार शेती आहे, हे पवार जाणतात. म्हणूनच पवारांनी आजवर कधीच शेती कायद्यांचा उघड विरोध केलेला नाही. ते फक्त असे करायला हवे होते, तसे करायला हवे होते असे म्हणतात. उघड विरोध करावा, मात्र, त्यांना सर्व सत्य माहित आहे.
LIVE TV : शेतकऱ्यांचा मोर्चा अडवला, मेट्रो सिनेमा चौकात पोलिसांनी मोर्चा अडवला, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप https://www.youtube.com/watch?v=6HNZGyPUEEY
सिंघू बॉर्डरपाशी दिल्लीतील दडपशाहीला तोंड देत शेतकरी ठाण मांडून त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. हे कृषी कायदे शेतकरी विरोधीच नाही, तर साऱ्या जनसमुदायाविरोधातील कायदे आहेत - कॉमरेड अशोक ढवळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते आंदोलक शेतकऱ्यांना संबोधणार आहेत.

Maharashtra Farmers Protest Update : शरद पवार आझाद मैदानाच्या दिशेने रवाना, तर बाळासाहेब थोरात आंदोलनस्थळी दाखल

आझाद मोर्चावरील शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार घरातून रवाना, थोड्यात वेळात आंदोलनस्थळी दाखल होणार तर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आंदोलनस्थळी पोहोचले
शेतकरी दु:खी असेल तर देशात कोणीही आनंदात राहू शकणार नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकरी मेहनत घेतोय. सारं धान्य उत्पन्न देशासाठी देतोय. हे तिन्ही कृषी कायदे रद्द करा- अबू आझमी

Farmers Protest : शरद पवार दुपारी शेतकरी मोर्चाला संबोधणार : विद्या चव्हाण


शरद पवारांकडे शेतकरी नेते म्हणूनच पाहिलं जातं. 25 तारखेला शेतकरी आंदोलन करणार असल्याचं समजल्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करुन मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शरद पवार दीड वाजता आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाऱ्यापासून वडापाव खाणाऱ्यापर्यंत प्रत्येकाने शेतकऱ्याचं ऋण मानलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं.

Maharashtra Farmers Protest update : शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी राज्यपालांकडून संध्याकाळी पाचची वेळ


शेतकरी मोर्चा आज राजभवनावर धडकणार, मात्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सध्या गोव्यात, संध्याकाळी मुंबईत परतणार, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी राज्यपालांकडून संध्याकाळीली पाचची वेळ, शेतकरी नेते राजभवनावर सचिवांकडे निवेदन देणार

मुख्यमंत्र्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, राष्ट्रवादीची भूमिका


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे. उद्धव ठाकरे घटनात्मक पदावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढणं संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे त्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला आहे. परिणामी मुख्यमंत्री या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे.

शेकऱ्यांना आंदोलना दरम्यान काळजी घ्यावी लागेल : संजय राऊत



शेकऱ्यांना आंदोलना दरम्यान काळजी घ्यावी लागेल, अद्याप मुंबईत कोरोना गेलेला नाही. अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ही काळजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे : संजय राऊत

आझाद मैदानावर मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न : विश्वास नांगरे पाटील


बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. आझाद मैदानात फक्त आंदोलन करता येतं, दक्षिण मुंबईत मोर्चे काढता येत नाही. आम्ही नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडताच मोर्चा थांबवण्याचा आमचा उद्देश आहे, अशी माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली

जागतिक स्तरावरील अभूतपूर्व आंदोलन उद्या राजधानीत होणार : संजय राऊत



शेतकरी आंदोलन गेल्या 60 दिवसांपासून देशाच्या राजधानीत सुरु आहे. उद्या ट्रॅक्टर रॅली आहे. जागतिक स्तरावरील अभूतपूर्व आंदोलन उद्या होत आहे. दिल्लीत जे शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही ठिकठिकाणचे शेतकरी मुंबई पोहोचले आहेत : संजय राऊत

मुख्यमंत्र्यांचा आंदोलनाला पाठिंबा: अजित नवले


कायदा मागे नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध संघटना मोर्चात सहभागी झाले आहेत. शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कायद्याला धरुन आम्ही सगळे शेतकरी अडीच वाजता राजभवनाकडे कूच करु, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
राजभवनावर जाण्यासाठी शेकऱ्यांचा मोर्चा निघाला तर, मोर्चा आझाद मैदानावरच अडवण्याचा प्रयत्न करणार, विश्वास नांगरे पाटील यांची 'एबीपी माझा'ला माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन प्रसिद्धीसाठी : रामदास आठवले


किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नाही. हे आंदोलन प्रसिद्धीसाठी आहे. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्न नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
केंद्र सरकारने कृषी कायदे मंजूर करण्याची घाई केली, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोर्चाची वेळ ओढावली आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

पारंपरिक वाद्य वादन आणि आणि नृत्याने आंदोलक शेतकऱ्यांच्या दिवसाची सुरुवात


मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. काल पारंपरिक तारपा नृत्याने रात्री या सर्व शेतकऱ्यांनी एकता दाखवली होती. तर आज या शेतकऱ्यांची पहाट ही पारंपरिक वाद्यांच्या वादनाने आणि पारंपरिक नृत्याने होत आहे. ढोल, टाळ आणि पावरी च्या वादनाने आजच्या आंदोलनाला सुरुवात होत आहे.
दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र रात्री देखील त्यांच्यात उत्साह दिसून आला. या ठिकाणी आदिवासी विभागातून आलेल्या शेतकऱ्यांनी रात्री एकत्रित पारंपरिक वाद्यांच्या धूनवर ठेका धरला. तारपा नृत्य करत या शेतकऱ्यांनी आपला थकवा घालवला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील या नृत्यात सहभागी झाल्या होत्या.
शेकडो किलोमीटर अंतर कापून मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानात निवांत झोपी गेले. मैदानात तयार करण्यात आलेल्या मंडपात हजारो शेतकऱ्यांनी रात्री आराम केला. या आंदोलनाला राज्यातील विविध पक्ष आणि संघटनांनी समर्थन दिले आहे. आज या आंदोलनात अनेक मोठे नेतेही सहभाग घेणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी भव्य व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. त्याच्या समोरच या हजारो शेतकऱ्यांनी आपला तळ ठोकला आहे.
शेकडो किलोमीटर अंतर कापून मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानात निवांत झोपी गेले. मैदानात तयार करण्यात आलेल्या मंडपात हजारो शेतकऱ्यांनी रात्री आराम केला. या आंदोलनाला राज्यातील विविध पक्ष आणि संघटनांनी समर्थन दिले आहे. आज या आंदोलनात अनेक मोठे नेतेही सहभाग घेणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी भव्य व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. त्याच्या समोरच या हजारो शेतकऱ्यांनी आपला तळ ठोकला आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.


 


या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झालं. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीनं देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकड्या देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.


 



 


उद्या राजभवनावर धडक
अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोन कॅमेरा यांचा देखील वापर करण्यात आला आहे. मुंबईत आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर आज सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.


 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होणार


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं काही शेतकरी संघटनांनी घेतलेल्या निदर्शनास पाठिंबा दर्शविला जाईल. नवाब मलिक पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या वतीने नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजभवनाकडे मोर्चा काढण्यात येईल. यापूर्वीचं शरद पवार यांनी शेतीशी संबंधित या कायद्यांना विरोध दर्शविला होता. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती.


 


मुंबईत शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांची नाकाबंदी


मुंबईत राज्याच्या विविध भागातून शेतकऱ्यांचा मोर्चा दाखल झाला. त्यातच प्रजासत्ताक दिनही दोन दिवसांवर आहे. यामुळे मुंबईत घातपाताची ही शक्यता असल्यानं मुंबई पोलीस अलर्टवर आहेत. परवा रात्रीपासूनच यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे. सशस्त्र पोलिसांसह, रिफ्लेकटर, एलईडी लाईट आणि अत्याधुनिक बेरिकेटिंगसह मुंबईच्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड, एलबीएस मार्ग, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि मुंबईच्या सर्वच वेशींवर मोठ्या प्रमाणत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे.



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.